नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरातील जवळपास सर्वच देशांत करोनाचा हाहाकार माजला आहे. प्रत्येक देश आपापल्यापरीने या करोनावर संशोधन करत आहे. यात अमेरिकेतही यावर संशोधन सुरु आहे. मात्र आता अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर आरोप केला आहे. करोना व्हायरसवरील संशोधनातील बौद्धीक संपदा आणि करोनाच्या संशोधनातील डेटा चोरत असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर मोठा आरोप केला आहे..
Secretary Pompeo
✔
@SecPompeo
China, the country where the virus originated and the pandemic was allowed to spread, has refused to share information to help the world respond to the COVID-19 pandemic.
34.8K
10:10 PM – May 14, 2020
Twitter Ads info and privacy
16.9K people are talking about this
ज्या संस्था करोनाशी निगडीत संशोधन करत आहेत. त्यांना चीनमधील सरकारशी निगडीत कंम्प्युटर हॅकर्सद्वारे लक्ष्य केले जाऊ शकते असा दावा एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी विभागाद्वारे करण्यात आला होता. त्यांच्या या दाव्यानंतर लगेचच पॉम्पिओ यांनी चीनवर करोनाच्या संशोधनाचा डेटा चोरत असल्याचा आरोप केला आहे.
चीनशी संबंधित असलेल्या सायबर हॅकर्सनं केलेल्या प्रयत्नांचा अमेरिका निषेध करते आणि अशा कारवाया थांबवल्या पाहिजेत असे आम्ही आवाहन करतो, असे पोम्पिओ यांनी एका निवेदनात म्हटले आहे. चीनचे असा देश आहे ज्या ठिकाणी या व्हायरसची उत्पत्ती झाली आणि त्यांच्यामुळेच जगभरात हा व्हायरस पसरला. चीनने करोना व्हायरसशी निगडीत माहिती जगाला देण्यास मनाई केली. त्यामुळेच आज मोठी समस्या निर्माण झाली आहे, असेही पॉम्पिओ म्हणाले.