नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात करोना व्हायरस सध्या थैमान घालत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेक स्थलांतरित विविध राज्यात अडकून पडले आहेत. या परिस्थितीत अनेक स्थलांतरित चालत, ट्रक अथवा कोणत्याही गाडीने गावी परतण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पंजाबमधील एका युवकाने करोना चाचणी न करताच घरात शिरण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या पत्नीने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
माहितीनुसार, संदीप पंजाब असे युवकाचे नाव आहे. पंजाबच्या तलवंडी साबो येथून हरियाणामधील घरी परतला होता. पंजाबच्या वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संदीपच्या पत्नीने त्याला करोना चाचणी करण्यास सांगितले. मात्र, संदीपने नकार देत पत्नीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पत्नीने थेट पोलीस स्टेशनला तक्रार केली. यानंतर पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन तसेच मारहाणीप्रकरणी संदीपला अटक केली आहे.