• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन दिवसात दिल्लीतील चाचण्या दुपटीने वाढवणार – गृहमंत्री अमित शहा यांची माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तेथील चाचण्यांचे प्रमाण आगामी 1-25 दिवसात दुपटीने वाढवले जाईल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शहा यांनी ही माहिती दिली.

प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रामध्ये करोनाची चाचणी करण्याची सुविधा सुरू केली जाईल. त्याशिवाय करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये घरोघरी सर्वेक्षण आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींचा पाठपुरावा केला जाईल, असेही शहा यांनी सांगितले.

दिल्लीतील करोना बाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये खाटा कमी पडू लागल्याने केंद्र सरकारने सर्व सुविधांनी सुसज्ज 500 रेल्वे कोच त्वरित उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्राला, दिल्ली सरकारचा आरोग्य विभाग, एम्स आणि दिल्लीतील तीन महापालिकांच्या डॉक्‍टरांचे संयुक्‍त वैद्यकीय पथक दिल्लीतील सर्व रुग्णालयांना भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पहाणी करेल, असेही शहा यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये रुग्णांच्या शेजारीच करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह ठेवले गेल्याचे उघड झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ‘आप’सरकारची झाडाझडती घेतली होती. दिल्लीमध्ये फारच थोड्या चाचण्या केल्या जात असल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्‍त केली होती. दिल्लीतील रुग्णांसाठी खाटा आणि व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याची सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना केली आहे.

याशिवाय ‘एम्स’मधील डॉक्‍टरांकडून फोनवरून मार्गदर्शन देण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा क्रमांक सोमवारी जाहीर केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून दिल्ली सरकारला ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, पल्स ऑक्‍सिमीटर आणि अन्य सर्व आवश्‍यक उपकरणे उपलब्ध करून दिली जातील, असेही शहा यांनी सांगितले.

दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या वाढली…
दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या 39 हजारावर पोहोचली आहे. तर 1,200 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या 17 सरकारी आणि 23 खासगी अशा एकूण 40 प्रयोगशाळांमध्ये 8,600 चाचण्या दररोज केल्या जात आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 242 इतकी झाली आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयांमधील 60 टक्के खाटा सवलतीच्या दरातील उपचार आणि चाचण्या देण्यायोग्य करोनाच्या रुग्णांसाठी राखीव राहाव्यात यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सोमवारी सादर केला जाईल.

एनसीसी, बालवीरांची पथकेही सक्रिय
दिल्लीतील करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटनांचे सहकार्य घेतले जात आहे. एनसीसी, एनएसएस, स्काऊट आणि अन्य संघटनांचा कार्यकर्त्यांचीही मदत घेतली जात आहे. दिल्लीतील तीन महापालिकांच्या महापौरांबरोबरही गृहमंत्री चर्चा करणार आहेत. या बैठकीला नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय आरोग्य मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.


 

 

Previous Post

शिरसोलीत पुन्हा १ कोरोना पॉझिटिव्ह आढळला ; गावात खळबळ

Next Post

गुजरातच्या कच्छमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे ‘धक्के’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुजरातच्या कच्छमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे 'धक्के'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon