नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – येत्या 1 जुलै पासून सुरू होणाऱ्या सीबीएसई आणि सीआयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना त्यांनी आधी दिलेल्या परिक्षांच्या आधारे सरासरी गूण द्यावेत किंवा इंटरर्नल ऍसेसमेंटच्या आधारे त्यांना गूण द्यावेत अशी मागणी पालकांनी केली आहे. सोशल मिडीयावर विविध नावांचे हॅश टॅग चालवून त्यांनी ही मागणी केली आहे.
या परिक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करणाऱ्या चार यचिका काहीं पालकांनी सर्वोच्च न्यायालयातही दाखल केल्या आहेत. देशातील करोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांनी ही मागणी केली आहे. आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात घालून या परिक्षा घेऊ नका आणि त्यांच्या जीवाशी खेळ करू नका अशी या पालकांची भूमिका आहे.