मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली जाईल अस मोदींनी सांगतिले. तर यावेळी मोदींनी भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेजही जारी केले आहे. मोदींच्या या भव्य पॅॅकेजचं राज्यातील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे.
त्यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक विकासासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल, असे चंद्रकांत पाटील म्हंटल आहे. याबाबतचे पत्रक देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे.