मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत आणखी दोघा जणांची भर पडली आहे. नागपुरात आणखी दोघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाग्रस्ताची पत्नी आणि सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नागपुरच्या सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रूग्णांवर पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये तर मुंबईतल्या कस्तुरबा रूग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.पुण्यात 9, मुंबईत 3, ठाण्यात 1 तर नागपुरात 3 रूग्ण कोरोनाबाधित आहे. एकूण महाराष्ट्रातली कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 16 वर जाऊन पोहचली आहे.’आदित्यसाहेबांना खासदारकीसाठी मी नाही आवडलो त्यांची चॉईस त्या बाईला’कोरोनाबद्दल सर्वकाही; IMA कडून महत्त्वाची माहिती जारी