जालना (वृत्तसंस्था) – जालन्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. मुंबईतून परतलेल्या 25 वर्षीय व्यक्तीला कोरोनानाची लागण झाली आहे. आता जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या 15 वर गेली आहे.
मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालन्यात परतलेल्या एक 25 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे जालना जिल्ह्यातील रूग्णांची संख्या पंधरावर पोहचली आहे. जालना शहरातील रामनगर भागातील रहिवासी असलेला हा तरुण दोन दिवसांपूर्वी जालन्यात परतल्यानंतर तो सरळ जिल्हा घाटी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या लाळेचे नमुने रुग्णालयाने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. याबाबतचा अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता पंधरावर पोहचली आहे. त्यामुळं जिल्ह्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.