नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे.गेल्या 24 तासात 1894 लोकांच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत कोविड 19 मुळे आतापर्यंत 83,425 जणांचा मृत्यू झालाय तर 14 लाखांहून अधिक जण कोरानाबाधित आहेत. या सगळ्यांमध्ये दिलासादायक माहिती अशी आहे की तीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये ब्रिटन दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये दोन लाखांहून अधिकजण कोरोनाबाधित असून 32692 जणांचा कोरोनामुऴे मृत्यू झालाय. तर इटलीत 31 हजार, स्पेन आणि फ्रान्समध्ये 27 हजार, ब्राझीलमध्ये 12 हजार लोकांचा कोरानामुळे मृत्यू झालाय.