चाळीसगाव (प्रतिनिधी ) – कोणत्याही राष्ट्रीय व प्रादेशिक राज्य आपत्कालीन संकटाच्या वेळी आपले दायित्व महत्वाचे असते या उदात्त हेतूने येथील गुजराथ अंबुजा एक्सपोर्टस लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी करोना व्हायरस या संसर्ग जन्य आपत्ती निर्मुलनासाठी गठीत मुख्यमंत्री मदत कोश covid-19 मध्ये सर्व कर्मचारी वर्गाने एक दिवसाचा पगार या साहाय्य विधीला मदत म्हणून ६१हजार ६५३रूपयांचे आर्थिक मदतीचा हात देऊन सहकार्य केले संकट काळात अंबुजा कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले असून मदतीचा हात देण्यासाठी व सेवेसाठी तन-मन-धनाने धावून जाणाऱ्या गुजरात अंबुजा एक्सपोर्टस लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे करोना व्हायरस या संसर्ग जन्य आपत्ती निर्मूलनासाठी गठित मुख्यमंत्री मदत कोश covid-19 मध्ये आपले एक दिवसाचे वेतन स्वखुशिने साहाय्य निधीला दिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान व एकजुटीचे सर्वत्र स्वागत होत आहे समाजात वावरतांना संकट काळी आपल्याच बांधवांसाठी आपले काही देणं लागत या उदात्त हेतूने कंपनीतील तब्बल62कर्मचारी वर्गाने आपला एक दिवसाचा पगार एकत्र करून ६१हजार ६५३ रुपयाचे आर्थिक योगदान दिले .
करोना संकट काळात अंबुजा च्या कर्मचाऱ्यांनी एकजुटीचे प्रदर्शन घडविले समोरआलेल्या संकटाचे भान ठेवून अत्यावश्यक अन्न साहित्य म्हणून कठिण परिश्रमाने स्टार्च, लिक्विड, गुलकोज ,चे उत्पादन करून ते संपूर्ण भारतात वितरित करण्यासाठी परीश्रम करून नागरिकांच्या गरजा पूर्ण करून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले .
गुजरात अंबुजा एक्सपोर्ट चे अध्यक्ष ब्रिज मोहन चितलांगे यांच्या हस्ते व महाप्रबंधक वैभव पाटील यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांकडून संकलित करण्यात आलेला ६१ हजार ६५३ रुपयाचा धनादेश माननीय जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी ब्रिजमोहन चीतलांगे यांच्या माध्यमातून साकारलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे गुजरात अंबुजा एक्सपोर्टस मध्ये विविध पदांवर कार्यरत तब्बल 62 कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार राज्याच्या आरोग्य सेवेसाठी दिला आहे या उपक्रमाबद्दल श्री चितलांगे यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांचे पाठीवर शाबासकीची थाप दिली संकटात कर्मचारी आपले सामाजिक दायित्व देश व समाजासाठी परीथीती जान ओळखून त्या दृष्टीने कार्य करीत असतात हि सदभावना प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवणे गरजेचे आहे, असेही चितलांगे साहेब यांनी आपल्या मनोगतातून कर्मचारी वर्गांसी बोलताना सांगितले
तसेच करोना निर्मूलनासाठी लॉकडाऊन चे काळात नागरिकांनी आपल्या घरी राहून पूर्णपणे शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन एक्सपोर्ट चे अध्यक्ष ब्रिज मोहन चित्रांचे यांनी केले व सर्व कर्मचारी वर्गाचे कौतुक करून संकट काळी असीच एकजुट ठेवा असे कर्मचारी वर्गाला आव्हान केले.
यावेळी योगेश काळे, प्रशांत वानखेडे, जगदीश पाटील, विजय पाटील, जिग्नेश पटेल, मनोज व्यास ,रामेश्वर राऊत ,रवींद्र जाळूलकर, सुधाकर शर्मा, योगेश भावसार, महेश मालविया, किरण नाव्हेकर ,आशिष गाडेकर, रमेश विजय्वेगी, सुरेश सूनागर,अधि कर्मचारी उपस्थित होते. गुजरात अंबुजा एक्सपोर्टस लिमिटेड ्या कर्मचार्यांच्या सामाजिक सेवा आर्थिक योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे..