नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना संसर्ग सुरू असतातना लॉकडाऊनला पंतप्रधान ग्रामीण आवास योजना -पीएमएवायने एका संधीत बदलले आहे. लॉकडाऊनमध्ये विक्रमी वेळेत मंत्रालयाने साडेतीन लाख घरे बनवली आहेत. लॉकडाऊन लागताच मंत्रालयाने दुरदर्शीपणे काम करत राज्य सरकारांच्या मदतीने प्रवासी मजूरांच्या डेटाचा वापर करत मजूरांना प्रशिक्षण, मेस्त्री आणि मजूरांना काम देण्यास सुरूवात केली. परिणामी 20 एप्रिलपासून सुरू झालेल्या घरकुलाच्या कामात शनिवारपर्यंत प्रत्येक दिवशी सरासरी 12 ते 13 हजारपर्यंत घरे बनवली जात आहेत.
ग्रामीण योजना प्रभावी बनवण्यात येत असलेली मजूर आणि सामानाची अडचण दूर करून मंत्रालय जोरदारपणे मार्च 2021 पर्यंत 1 करोड 21 लाख घरे बांधण्याच्या तयारीला लागले आहे. यामध्ये आतापर्यंत 22 लाख घरे बनवण्यात आली आहेत. 48 लाख घरांसाठी तिसरा हप्ता जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेत मार्च 2022पर्यंत 2 करोड 21 लाख घरे बनवायची होती. ग्रामीण आवास योजनेसाठी केंद्र सरकारने यावर्षी मंत्रालयाला 19 हजार पाचशे करोड रूपये दिले आहेत.