नवी मुंबई (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाचा कहर सुरु असतनाच अभिनेता कमाल खान उर्फ केआरके वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने देशाच्या विकासाबात मत व्यक्त केले आहे. पुढील 100 वर्ष आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही अशी धक्कादायक भविष्यवाणी त्याने केली आहे.
देशांत हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा, डॉक्टर्स, राजकारणी आणि इतर उद्योगातील लोक इतका भ्रष्टाचार करतात, तो देश कधीही प्रगती करु शकत नाही. भ्रष्टाचार असाच वाढत राहीला तर पुढील 100 वर्षे आपल्या देशात विकास होऊ शकणार नाही. हे दुर्दैवी पण ते सत्य आहे. अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे. कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या भविष्यवाणीसाठी केआरकेवर जोरदार टीका देखील केली आहे.