धुळे – देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना हि शहरातील पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुने रुग्णालय आवारातून चोरट्याने परिचारीकेची अॅक्टीवा गाडी लंपास केली.
याबाबत मिळालेली माहिती की,लॉक डाऊन तिसरा टप्पा सुरू असताना शहरातील जुने जिल्हा रुग्णालय सकाळी नेहमीप्रमाणे कामकाजासाठी आलेल्या परिचारीका संगिता चव्हाण यांनी आपली अॅक्टीवा गाडी आवारात पार्किंग जागेवर उभी करून कामकाजासाठी निघुन गेल्या दुपारी जेवणाची सुट्टी झाली होती.त्यावेळी संगिता चव्हाण ह्या रुग्णालयातील आवारात आल्या त्यावेळी त्यांचे चटकन लक्षात आले की आपली अॅक्टीवा गाडी आवारात नाही.ती चोरली गेली आहे.जवळपास गाडीची शोधा शोध केली गाडी सापडली नाही.
आज जागतिक परिचारिका दिन व परिचारीकेची गाडी आवारातून चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली.गाडीचा शोध चटकन लागावा या करीता एक मोठा मजकूर लिहिलेला संदेश सोशल नेटवर्किंग साईट वर अपलोड करण्यात आला आहे.
लॉक डाऊन असताना चोरटे सक्रीय झाले आहे.शहरात चोका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात असताना हि चोरी सत्रात वाढ होत आहे.अशी चर्चा नागरिकांत रंगली होती. शहर पोलीस ठाणे गाठत काळ्या रंगाची अॅक्टीवा गाडी क्रं.एम एच 18 / बी क्यु 8736 अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.अशी लेखी तक्रार संगिता चव्हाण यांनी दाखल केली आहे.
शहर पोलीसांनी लेखी तक्रार आधारे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहे.








