औरंगाबादेत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. मंगळवारी आणखी २४ जणांचे काेराेना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णाचा एकूण आकडा ६५१ वर जाऊन पोहोचला गेला आहे. तर रामनगरमधील ८० वर्षीय व पुंडलिकनगरमधील ५८ वर्षीय या दाेघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या १५ झाली आहे.
४० जण कोरोनामुक्त
दरम्यान कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील रुग्णांची संख्या वाढ चालली असून याबरोबरच दिलासादायक बाब म्हणजे साेमवारी ४० जण काेराेनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे
हे आहेत डेंजर झोन
शहरातील कोतवालपुरा, जुना बाजारसह सातारा परिसरातील सदानंदनगर या नवीन भागात रुग्ण सापडल्यामुळे हे भागही आता हाॅटस्पाॅट ठरले आहेत. दरम्यान, एकूण रुग्णांपैकी २१ टक्के म्हणजे १३१ रुग्ण रामनगर आणि संजयनगर या ३०० मीटरवर अंतरावरील दाेन गल्ल्यांमध्येच आढळल्याने हा भाग आता डेंजर झाेन बनला आहे.
मोठे हॉटस्पॉट
मुकुंदवाडी- संजयनगर हा काेराेनाचा माेठा हाॅटस्पाॅट ठरला आहे. या भागात तब्बल ८९ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने हा भागच सील करण्यात आला आहे. आता रविवारपासून या गल्ल्यांच्या शेजारीच असलेल्या रामनगरमध्येही दाेन दिवसांत ४२ बाधित रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या २१% रुग्ण या ३०० मीटर अंतरावरील दाेन वसाहतींतच सापडल्यामुळे आराेग्य विभागाने या भागात कसून तपासणी सुरू केली आहे. यापूर्वी आसेफिया कॉलनी, जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी या दाेन किमीच्या परिघात सर्वाधिक रुग्ण सापडत हाेते. साेमवारी रामनगरमध्ये सापडलेल्या २२ रुग्णांत तीन, आठ, नऊ, ११ वर्षांची बालके आहेत. तर ६५ वर्षांच्या प्रत्येकी एक महिला व पुरुषाचाही समावेश आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यात असा आहे कोरोना बाधितांच्या आकडा.
बीड : ११ अहवाल निगेटिव्ह
बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून संशयितांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. रविवारी ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बीड व केज येथील रुग्णालयातून हे स्वॅब पाठवले होते.
जालना : ३ रूग्ण पॉझिटिव्ह
रविवारी जालना जिल्ह्यात ३, तर नांदेडला ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बीड जिल्ह्यात संशयितांचे ११ अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, लातूर जिल्ह्यात उदगीर येथे पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तेथील रुग्णांची संख्या २७ झाली. जालना तालुक्यातील इंदेवाडी येथील महिला व कानडगाव (ता. अंबड) येथील आई व तिचा मुलगा पॉझिटिव्ह आढळले.
नांदेड : रुग्णांची संख्या ५१
नांदेड येथे रविवारी पुन्हा सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५१ झाली.कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वजण यात्रेकरू असून त्यातील एक ठाण्याचा पुरुष, पंजाबमधील एक पुरुष, दोन महिला व उत्तर प्रदेशातील तीन महिलांचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात १ रूग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात ३६ दिवसांनंतर म्हणजे ४ एप्रिलनंतर सोमवारी नवीन रुग्ण आढळून आला आहे. परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मो भाजीपाला तसेच फळांचा व्यापारासाठी पुणे तसेच मुंबईला जाऊन आला होता.