मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या काळात राज्यच्या पोलीस दलावर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे त्यांना थोडी विश्रांतीची गरज आहे. यासाठी आता राज्याच्या गृहखात्याने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) वीस कंपन्या म्हणजेच 2000 केंद्रीय पोलिसांची मागणी केली आहे. याबाबतची माहिती राज्यचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पोलीस दलाची मागणी केली होती. त्यानुसार आता अनिल देशमुख यांनी देखील मागणी केली आहे. कैक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कामाची वेळ आणि आव्हानंही दिवसागणिक वाढत आहेत. शिवाय रमजान ईदही येऊ घातली आहे. म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याने तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्यांची मागणी केंद्राकडे केली आहे,” असं अनिल देशमुख म्हणाले.
ANIL DESHMUKH
✔
@AnilDeshmukhNCP
कैक पोलीसांना कोरोनाची लागण झालीय, त्यांच्या
कामाची वेळ व आव्हानंही दिवसागणिक वाढतायत व रमज़ान ईद ही येऊ घातली आहे. म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याने तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची
केंद्राकडे मागणी केली आहे.#MaharashtraGovtCares
Embedded video
174
1:06 PM – May 13, 2020
Twitter Ads info and privacy
51 people are talking about this
सध्या राज्य राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या 32 कंपन्या पोलीस दलाच्या मदतीला आहेत. मात्र सततच्या कामाच्या ताणामुळे पोलिसांनाही विश्रांतीची गरज आहे. ही बाब लक्षात घेता राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात, अशी मागणी केल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील तब्बल एक हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झआली आहे. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणे पोलीस फ्रण्ट लाईनवर लढत आहेत. परंतु या कोरोना योद्ध्यांमध्येच संसर्ग झाल्याने चिंता वाढली आहे.







