जळगाव ( प्रतिनिधी) – कोरोनाच्या भीतीने दुकानापुढे गर्दी करू नका असे बोलल्याचं राग येऊन तिघांनी मिळून दोन मुलांसह आईला मारहाण केल्याची घटना आज तालुक्यातील धानवड येथे घडली या आरोपींविरुद्ध जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
राहुल रघुनाथ राठोड (वय 25, रा. धानवड ता. जि. जळगाव) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते दि. 12 मे रोजी रात्री 9.00 वाजेचे सुमारास गावातील संजु मावशी यांचे दुकानावर गेले त्यावेळी तेथे भगवान राठोड, धोंडु राठोड , सनी राठोड तसेच इतर लोक उभे असतांना ,येथे गर्दी करू नका सध्या कोरोनाचा आजार चालु आहे. असे म्हणाल्यावर भगवान राठोड यास राग आल्याने त्याने मला तुला जास्त झाले आहे तु कोण आम्हाला सांगणारा अशी दमदाटी , शिविगाळ करून मारहान केली त्यावेळी भाऊ निलेश ,दिनेश सोडविण्यासाठी आले होते. ते सोडवित असतांना धोंडु राठोड ,सनी राठोड यांनी निलेश आणि दिनेश यांनाही मारहान केली . नंतर भगवान राठोड याने घरी जाऊन कपाशी उपटण्याचा लाकडी चिमटा घेऊन , येऊन मारहान केली. त्यात माझ्या पाठीला ,डोक्याला दुखापत झाली भाऊ निलेश व आई सुशिलाबाई यांनी मला वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाऊच्या उजव्या हातांचे बोटास व आई सुशिला बाई हिचे उजव्या हातास दुखापत आली आहे.