• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचा मदतीसाठी हातभार – सौरव शाह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – देशावर कोणतीही राष्ट्रीय आपत्ती आली असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक तात्काळ धावून जातो. आजही ही कोविड-१९ अर्थात कोरोना काळात संपूर्ण देशभर रासेयोचा स्वयंसेवक शासनाच्या विविध उपक्रमांना हातभार लावण्यासाठी सक्रीय आहेत. असे गौरवोद्गार राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक सौरव शाह यांनी काढले. कबचौउमवि विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रासेयो विभागीय कार्यालय,पूणे, रासेयो विभाग उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी श्री शाह बोलत होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ.अतुल साळुंके, पुणे गोवा राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक कार्तिकेयन, युवा अधिकारी अजय शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ .बी. व्ही. पवार, युनिसेफचे तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या ऑनलाईन वेबिनारच्या उदघाटन सत्रात राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मांडताना आत्तापर्यंत स्वयंसेवकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचा आढावा घेतला. सोबतच कोविड- १९ अर्थात कोरोना महामारी च्या काळात कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रीय सेवा योजनेचे पुणे गोवा विभागीय संचालक कार्तिकेयन यांनीही राज्यातील विविध विद्यापीठांच्या कार्याचा आढावा घेतला व वेबिनार आयोजनाबाबत विद्यापीठाचे कौतुक केले. तर विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. पी. पी .पाटील यांनी शुभेच्छा संदेश दिला. प्र-कुलगुरू माहुलीकर यांनी विद्यापीठाच्या वतीने या काळात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनीही कोरोनाच्या काळामध्ये स्वयंसेवकांनी सामाजिक भान ठेवून ही जबाबदारी पार पाडली असे सांगितले.

वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात युनिसेफच्या डॉ .राजलखमी नायर यांनी आरोग्याच्या बाबतीत महत्वाची जनजागृती करताना स्वयंसेवकांनी आणि समाजाने या काळात घ्यावयाची जबाबदारी व आरोग्याच्या समस्यांबाबत असलेल्या उपाययोजना संदर्भात भूमिका मांडली तर युनिसेफचे डॉ. शैलेश पाटील यांनी कुपोषण, आयुष्यमान भारत, बेटी बचाव बेटी पढाव, भारत सरकारच्या योजना यासंदर्भात युनिसेफच्या माध्यमातून चालणारे कार्य व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या कार्याबाबत माहिती दिली. भुवनेश्वर येथील डॉ. एन .बी.खुंतीया यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिर काळात काय खबरदारी घेतली पाहिजे, सनेटायझर आणि सोशल डिस्टन्स याबाबतीतले उपाय योजना यावर भाष्य केले. सत्राच्या शेवटी जळगाव येथील डॉ .सतीश पाटील यांनी कोरोना काळात समाजावर होणारे मानसिकदृष्ट्या परिणाम काय आणि कसे आहेत त्यासाठी मानसोपचार आणि समुपदेशन याबाबतीत भूमिका मांडली. वेबिनारच्या या संपूर्ण काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य सचिव डॉ. प्रवीण महाले, डॉ.वैभव सबनीस, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. वाल्मीक आढावे, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ . विजय मांटे, जळगाव जिल्हा नोडल ऑफिसर डॉ. दिनेश पाटील, धुळे जिल्हा नोडल ऑफिसर डॉ .प्रशांत कसबे यांच्यासह तिनही जिल्ह्यातील विभागीय समन्वयक परिश्रम घेत आहेत़ .या राष्ट्रीय वेबिनार मध्ये देशभरातील विविध विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक, विविध पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक आणि समाजसेवेची आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.


 

 

Previous Post

पाचोरा एसटी डेपोत कर्मचारींना मोफत होमीओपॅथीक गोळ्या वाटप

Next Post

जळगावात बेकायदेशीर धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरूणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात बेकायदेशीर धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरूणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon