शिरपूर ग्रामिण पोलीसांकडून दोघांना अटक
धुळे – (प्रतिनिधी) शिरपूर ग्रामिण पोलीसांनी लॉक डाऊन दरम्यान महामार्गावरुन jभाजीपाला व फळे भरण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या कॅरेट मधुन अवैध वाहतूक करताना महिंद्रा पिकअप व्हॅन गाडीतून एक लाख बारा हजार रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्यांसह दोन जणांना गजाआड केले आहे.
शिरपूर ग्रामिण पोलीस ठाण्यातील स.पो.नि.अभिषेक पाटील यांना खबरी मार्फत गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार एक पथक तयार करून
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई आग्रा महामार्गावर लॉक डाऊन सुरु असताना महामार्ग सुरक्षा चौकी जवळ नाकाबंदी लावून वाहन तपासणीस केली.बोलेरो पिक अप क्रं. एम एच 41 एयु 1567 गाडी ची तपासणी सुरू केली.भाजीपाला,फळे भरण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिकचे कॅरेट व खोक्यात देशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या पोलीसांना गुंगारा देण्यासाठी हि शक्कल लढविली गेली होती.परंतू पोलीसांच्या नजरेतून हा प्रकार उघडकीस आला.गाडी चालक व सह चालकाला पोलीसांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले. गाडीतील प्लास्टिक कॅरेट पिवळे,लाल रंगाचे नग 1567,सह बोलेरो पिक अप गाडी किंमत 50,000 लाख रुपये.
45 खोक्यात प्रत्येकी 48 बाटल्या प्रमाणे 2160 दारु बाटल्या.रुपये 1लाख 12हजार 320 रुपये.
वाहन चालक सुनिल प्रकाश मगर ( वय.28 ) व साथीदार सुधीर हिरामण पवार ( वय.21, दोन्ही रा.मालेगाव ) यांना अटक करण्यात आली या
दोघांविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलीस अधिकारी राजू भुजबळ,यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील,असई नियाज शेख,पो,कॉ.योगेश दाभाडे,गवळी, जाधव आदींनी केली. पुढील तपास सपोनि अभिषेक पाटील करत आहे.