नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सध्या जगभरात ‘कोरोना’ विषाणूने मोठा हाहाकार माजवला आहे. या भयानक विषाणूमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गुगल आणि ॲपल या दोन दिग्गजा कंपन्यांनी एकत्र आल्या असून, यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या दोघांनी एकत्रितपणे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ टूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर हे तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या फोनवर याची माहिती देईल. यात युजरजी ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार आहे.