धुळे – गावातील घराला अचानक पणे आग लागून आगीत घर व वयोवृद्ध महिला हि आगीत होरपळून मयत झाली.याबाबत मिळालेली माहिती की,काल रात्री अकरा ते साडेअकरा वाजे दरम्यान ग्रामपंचायत वाघाडी खुर्द,बाभळे ता-शिंदखेडा जि-धुळे येथील आधार डोगर मोरे याच्या घराला अचानकपणे आग लागली.आगीने रौद्ररूप धारण केले.आधार मोरे यांनी आरडाओरड केली.गावातील काही मंडळी धावत आली.आगीवर त्यांनी बादलीतून पाणी मारा करायचा प्रयत्न केला.आगीवर ग्रामस्थांना नियंत्रण मिळवता आले नाही.आगीबाबत धुळे मनपा अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.माहिती मिळताच तातडीने मनपा अग्निशामक दलाची एक गाडी शहरात लॉक डाऊन करता लावले अडथळे दूर करत वाट काढत काही मिनिटांनी घटनास्थळी पोहचली. अग्निशमन अधिकारी तुषार ढाके, वाहन चालक – भूषण अहिरे, फ़ायरमन-सचिन करनकाळ ,किरण साळवी यांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.या आगीत वयोवृद्ध महिला पदमाबाई डोगर मोरे यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.हि बातमी गावात वाऱ्या सारखी पसरली या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.