• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर होणार प्रदर्शित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2020
in भारत, महाराष्ट्र, सिनेमा
0


मुंबई (वृत्तसंस्था) – अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांच्या ‘जीसिम्स’ स्टुडीओने हिंदी निर्मितीमध्ये पाऊल टाकले असून प्रख्यात बॉलीवूड दिग्दर्शक कुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ या नवीन शोची निर्मिती ते करत आहेत. ही वेब मालिका ‘झी5’वर दाखल होत असून राजीव खंडेलवाल त्यात प्रमुख भूमिकेत आहे. भारतातील एक आघाडीचा स्टुडीओ म्हणून ख्याती असलेल्या ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) ने चित्रपट, टेलीव्हीजन आणि वेबसिरीज या क्षेत्रांमध्ये निर्मिती केली आहे. मराठीमध्ये कंपनीने अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रदर्शित केले आहेत. अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांच्या नेतृत्वाखालील या स्टुडीओने मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांची निर्मिती केली असून भिकारी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. त्या चित्रपटांच्या माध्यमातून कंपनीने या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले आहेत. स्थापनेपासून केवळ सात वर्षांमध्ये मनोरंजन विश्वातील दर्जेदार निर्मितीच्या माध्यमातून आपला खास असा ठसा कंपनीने उमटवला असून आता ती हिंदी मालिका निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे.
दर्जेदार निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘जीसिम्स’ने ‘नक्सल’च्या माध्यमातून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. या मालिकेची संकल्पना अर्जुन आणि कार्तिक यांनी ‘झी5’च्या सहकार्यातून आखली आहे. ही मालिका भारतातील नक्षलवादी चळवळीवर बेतली आहे. या मालिकेसाठी तब्बल दिड वर्षांचे संशोधन केले गेले आहे आणि त्यासाठी या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे सहाय्य घेतले गेले आहे. या मालिकेमध्ये वेब जगतातील अनेक आघाडीचे चेहरे नक्षलवाद्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
कुणाल कोहली हे बॉलीवूडमधील एक आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी फना, हम तुम, मुझसे शादी करोगी यांसारखे अत्यंत गाजलेले चित्रपट दिले आहेत. ‘नक्सल’ ही त्यांची पहिलीच वेबसिरीज असून ती त्यांच्या चित्रपटाएवढीच लोकप्रिय ठरेल, असा पूर्ण विश्वास आहे.
“नक्सल’मधील अत्यंत आव्हानात्मक अशा विषयाच्या माध्यमातून वेबसिरीज या अत्यंत लोकप्रिय अशा माध्यमामध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याची संधी मिळत असल्याचा मला आनंद आहे. या मालिकेची संकल्पना अर्जुन आणि कार्तिक यांची आहे. मी त्यांच्याबरोबर या विषयावर गेले सात महिने विचारविनिमय करतो आहे. या मालिकेचा नायक राजीव खंडेलवाल आहे, हीसुद्धा महत्वाची गोष्ट आहे. कारण यांसारख्या विषयाला पूर्ण न्याय देण्याची त्याची क्षमता आहे. ‘झी5’च्या संपूर्ण चमूचा मी मनापासून आभारी आहे. त्यातही ‘झी5’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तरुण कटियाल यांचा मी खूपच आभारी आहे कारण त्यांनी या मालिकेच्या प्रत्येक बाबीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे,” असे उद्गार कुणाल कोहली याने काढले.
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी म्हटले की, या मालिकेच्या माध्यमातून हिंदी वेबसिरीज क्षेत्रात पदार्पण करत असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. “हिंदीमध्ये पहिल्या वेबसिरीजची निर्मिती करत असल्याचा आम्हांला खूप आनंद आहे. बॉलीवूडमधील एक सर्वात यशस्वी दिग्दर्शक म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या कुणाल कोहली यांच्या दिग्दर्शनाखाली ही मालिका आकाराला येत आहे आणि त्यात प्रमुख भूमिकेत आम्हाला राजीव खंडेलवाल लाभला आहे, हे आम्ही आमचे भाग्य मानतो. ‘झी5’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तरुण कटियाल यांनी या निर्मितीसाठी आम्हाला मोलाचे असे सहकार्य केले आहे. त्यामुळे वेबसिरीजच्या क्षेत्रात ही मालिका स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण करेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”


 

 

Previous Post

अमिताभ बच्चन यांनी शेअर केली ‘कोरोना’वर कविता

Next Post

टॉम हँक्स आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

टॉम हँक्स आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon