मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापनदिन साजरा केला जात आहे. मनसेच्या या 14 व्या वर्धापनदिनानिमित्त आज नवी मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यात मनसेनी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली. राज्यातील विविध विभागांवर नजर ठेवण्यासाठी या शॅडो कॅबिनेटची स्थापना झाल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं. मनसे कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागावे असं राज ठाकरे म्हणाले. राज्यात काही जण RTI टाकून लोकांना ब्लॅकमेल करतात. असा प्रकार कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्यांनी करू नये असं राज ठाकरे यांनी बजावलं. काही जण चांगल्या कामासाठी RTI टाकतात पण असेही काही लोक आहेत जे ब्लॅकमेलिंगचा व्यवसाय करतात असं राज ठाकरे म्हणाले. मला विचारल्याशिवाय कुणीही पत्रकार परिषद घ्यायची नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.गृह, विधी, न्याय, सर्वसामान्य प्रशासन विभाग बाळा नांदगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
राज्यातल्या महाविकास आघाडीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेटचा ठराव पहिल्या अधिवेशनात मांडला होता. या कॅबिनेटमध्ये मनसेच्या नेत्यांना खातेनिहाय जबाबदारीचे वाटप होणार आहे.
1. गृह, विधी व न्याय, – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजीव नाईक, राहुल बापट2. जलसंपदा, माहिती जनसंपर्क – अनिल शिदोरे, अमित ठाकरे3. गृहनिर्माण, वित्त नियोजन – नितीन सरदेसाई4. महसूल, परिवहन – आदित्य शिरोडकर5. ग्रामविकास – जयप्रकाश बावीसकर, अमित ठाकरे, प्रकाश भोईर6. वने, आपत्ती व्यवस्थापन – संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी7. शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी8. कामगार – राजेंद्र वाघसकर, गजानन काळे9. नगरविकास, पर्यटन – संदिप देशपांडे, अमित ठाकरे10. सार्वजनिक आरोग्य – रिटा गुप्ता11. अन्न नागरी पुरवठा – राजा चौगुले, विशाल पिंगळे12. महिला व बालविकास – शालिनी ठाकरे13. सार्वजनिक बांधकाम – संजय शिरोडकर14. सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर