नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात करोनाचा थैमान सुरु आहे त्यातच आता देशातील अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारकडून हळूहळू प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी आज देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे म्हटले.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधानांनी, आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहवं लागंल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत,’ असे म्हटले.करोनाच्या संकटादरम्यान त्यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.







