नागपूर (वृत्तसंस्था) – नागपूरात आज पुन्हा दोन कोरोना ग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना पोजिटिव्ह नमुन्यांचा नागपुरातील एकूण आकडा हा आता 27 वर पोहचला आहे. 5 एप्रिलला 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्याचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह आला होता. याच मृत व्यक्तीच्या संपर्कातील दोघांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी काल या कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या संपर्कातील 6 जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. या सर्व कोरोना पोजिटिव्ह व्यक्तींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.
नागपूर कोरोना- एकूण पोजिटिव्ह नमुने – 27, मृत्यू – 1, बरे होऊन सुट्टी झालेले – 5, उपचार सुरू – 21