नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. तत्पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक खास मागणी केली आहे. देशातील ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यातील गरिब कुटुंबियांच्या खात्यात मदत निधी जमा करण्याची तरतूद करावी, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत ही मागणी उचलून धरावी, अशी सूचनाही त्यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. पी.चिदंबरम यांनी यासंदर्भात ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. गरिब कुटुंबातील अनेक जणांचा रोजगार गेला आहे. त्यांच्याजवळ आता पैसा नाही. सरकारकडून मोफत जेवणासाठी ही मंडळी रांगेत उभे राहताना दिसत आहे.कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटात अडकलेल्या गरिब कुटुंबियांच्या मदतीसाठी ६५ हजार कोटींची तरतूद अपेक्षित आहे, असा उल्लेख चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे . राज्यातील गरिब जनतेला तुम्ही उपाशी पाहू शकता का? असा प्रश्न उपस्थितीत करत गरिब कुटुंबियांना मदत निधी मिळावा, याचा प्रस्ताव एकमताने पंतप्रधानांसमोर ठेवा, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.