सांगली (वृत्तसंस्था) – इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील 25 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेल्या एका महिलेलाही कोरोनाची लागण झाली होती. आता हे सर्व 25 कुटुंबीय कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेली महिला अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहे. यामुळे आता सांगली जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. काल 22 जणांचे कोरोना अहवाल हे निगेटिव्ह आले होते. आज पुन्हा तिघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आता या कुटुंबात एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही. दरम्यान त्यांच्या संपर्कातील 1 महिलाच अजून पोझेटिव्हच आहे. या महिलेवर उपचार सुरू आहेत. सांगली येथे एकूण 25 ‘कोविड-19’ ग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आले होते यानंतर यात एका रुग्णांची भर पडली होती. ज्या 25 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यांचे 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे