जळगावातील अजिंठा चौफुली वर दुर्घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) आज रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास शिरासोली येथून जळगाव तोलकाट्यावर जाणार्या आयशरर्ने दुचाकी स्वाराला धडक दिली या अपघातात कुसुबा कडून शहराकडे जाणारा दुचाकी स्वार ठार झाला
जखमी दुचाकीस्वाराच्या मोबाईल वरून या अपघाताची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना दिली आणि त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय मार्फ़त जळगाव वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी या जखमी व्यक्तीला मृत घोषित केले. शिवदास वाणी असे या मयत दुचाकीस्वारा चे नाव आहे तो शहरातील प्रजापत नगरातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले. या अपघातातील आयशर वाहनाचा क्रमांक एम एच 19 / झेड 5306 असा आणि दुचाकींचा क्रमांक एम एच 19 डी एम 8949 असा आहे ही आयशर ट्रक महाबळ कॉलोनीतील संजय दौलत कोळी यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. या मालकाच्या आणि चालकाच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यातचे काम सुरू आहे. पुढील पोलीस तपास सुरु आहे