औरंगाबाद (प्रतिनिधी) शहराजवळच्या करमाड शिवारातील रेल्वे रुळाजवळ मालगाडीने चिरडल्याने 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज पहाटे घडली .
करमाड पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही दुर्घटना लक्षात आल्यानन्तर तासाभरात सुरु केली. काही प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ते सगळे मजूर जालन्याहून मध्य प्रदेशात पायी निघाले होते. वाहनांच्या रस्त्याने पोलीस अडवातील म्हणून रेल्वे रुळांच्या निर्मनुष्य मार्गाने ते औरंगाबाद पर्यंत पायी जात होते रेल्वे बंद असल्याने ते रात्री रुळावरच झोपलेले होते झोपेतच त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने हे 15 मजूर चिरडले गेले शेंद्रा एमआयडीसी भागातील काम अर्धवट असलेल्या एका पुलाच्या आधाराने मोकळी जागा पाहून ते रुळांवर झोपले होते ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास घडली असावी असे सांगण्यात आले स्थानिक लोकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यावर तासाभरात पोलीस घटनास्थळी पोहचले
कोरोना लॉक डाउन काळातील सरकारी यंत्रणांचा नियोजन शून्य कारभार आणि अनास्थेने हे 15 बळी घेतले असल्याचा संताप व्यक्त होत आहे . हे मजूर मध्य प्रदेशात नेमके कुठे जात होते आणि त्यांच्या मृतदेहांची ओळख पटविण्याबद्दल ची माहिती लगेच समजू शकली नाही
कोरोना प्रादुर्भावाने हैराण असलेल्या औरंगाबाद येथील पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला या मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या गावी पाठवणे जिकिरीचे ठरणार असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे