अमळनेर (प्रतिनिधी) – नगरपालिकेने कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दीचे ठिकाण चित्रपट गृह सह गर्दीचे ठिकाण बंद ठेवण्याचे आव्हान पत्राद्वारे केले आहे. देशा सह राज्यात ठिक ठिकाणी कोरोना या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शहरी शाळा -महाविद्यालये, काही गर्दीचे ठिकाणे उदा. चित्रपट गृह, मॉल आदी दि 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे अध्यादेश जारी केले आहे. व तसे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयाला उपाय योजना आखण्यास सक्त आदेश दिले आहेत. त्याच आदेशानुसार अमळनेर नगरपालिकाचे उपमुख्यधिकारी संदीप गायकवाड यांनी काल परिपत्रक काढून शहरातील व्यायाम शाळा, सर्व माँल, चित्रपट गृह महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग नवीन मंत्रालय मुबंई कडील दिनांक15 मार्च 2020 च्या परिपत्रक नुसार दिनांक 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे, तसे करण्यासाठी सदर व्यवस्थापनास विनंती केली आहे.