नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस लवकरच खात्मा होणार आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर बहुतेक रुग्ण ठीक होत आहे. अशा ठीक झालेल्या रुग्णांच्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढत आहे. एकदा त्यांना कोरोना झाला तर तो पुन्हा या रोगप्रतिकारक शक्तीमुळे होऊ शकत नसल्याचे समोर आलं आहे. हीच गोष्ट लक्षात घेता जपानच्या एका औषधनिर्माण संस्थेनं म्हंटले आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेला व्यक्ती जर या व्हायरसपासून ठीक झाला. तर त्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना बद्दल रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशातच बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या रक्तातूनच कोरोना व्हायरसवर औषध, लस, बनवता येऊ शकते. त्यावरून आता जपानची एक औषधनिर्माण संस्था कोरोनापासून बऱ्या झालेल्या व्यक्तीचा रक्तावरून कोरोनावरची लस, औषध तयार करण्यासाठी सज्ज झाली आहे. जपानबरोबरच चीनमध्येही ही लस बनवण्याचे काम सुरू आहे.वैद्यकीय विज्ञानाच्या सिद्धांतानुसार, विषाणूपासून मुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात ‘रोग-प्रतिकारक प्रथिने’ तयार होतात. जर हे प्रथिने दुसऱ्या आजारी व्यक्तीच्या शरीरात सोडले तर त्याचा फायदा होऊ शकतो. अशा प्रथिनांना अॅंटीबॉडीज असे म्हणतात. सहसा आजारी व्यक्तीचे शरीर स्वत:च प्रतिपिंडे विकासित करण्याचे प्रयत्न करत असते. मात्र जर औषध उपलब्ध असेल तर रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. कोरोना व्हायरसवर सध्या हा उपाय जरी शोधला गेला असला. तरी औषध बनवण्यास अद्यापही या कंपऩ्यांना यश आले नाही. सध्या हे औषध बनवण्याचे काम सुरू आहे.