मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात 1165 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच दिवसभरात कोरोनाची लागण होऊन 48 जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या 1165 रुग्णांमुळं राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 228 इतकी झाली आहे. तर आजच्या दिवशी 330 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3 हजार 800 रुग्ण कोरोनापासून बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 27 हजार 804 नमुन्यांपैकी 2 लाख 06 हजार 481 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले असून 20 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसंच राज्यात 2 लाख 41 हजार 290 नागरिक होम क्वारंटाइनमध्ये असून 13 हजार 976 नागरिक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात मृत झालेल्या 48 रुग्णांमध्ये 21 पुरुष तर 27 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 27 रुग्ण असे आहेत की ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. तर 18 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील आणि 3 रुग्ण 40 वर्षांखालील असल्याची माहिती मिळते आहे. या रुग्णांमध्ये मुंबई मधील 27, पुण्यातील 9, मालेगाव शहरात 8, पुणे जिल्ह्यात 1, अकोला शहरातील 1, नांदेडमधील 1 रुग्ण तर 1 रुग्ण अमरावतीमधील आहे.
Rajesh Tope
✔
@rajeshtope11
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 20228. Today, newly 1165 patients have been identified as positive for Covid. Also newly 330 patients have been cured, totally 3800 Covid19 patients have been cured and discharged from the respective hospitals.
652
9:08 PM – May 9, 2020