मुंबई (वृत्तसंस्था) – आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या धारावीत कोरोना व्हायरसचे थैमान सुरुच आहे. आज धारावीत कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीत कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. त्यामुळं धारावीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 833 वर जाऊन पोहचली आहे. तर आतापर्यंत या आजारानं परिसरातील 27 जणांचा बळी गेला असून 222 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आज मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी धारावी परिसरातील कोरोनाग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. ह्या वेळेस त्यांनी धारवीतील कोरोना तपासणीवर अधिक भर दिला जाणार असल्याचं म्हंटल आहे.
ANI
✔
@ANI
25 new COVID19 positive cases, 1 death reported in Mumbai’s Dharavi today; till now 833 positive cases and 27 deaths have been reported. 222 people discharged today: Brihanmumbai Municipal Corporation
View image on Twitter
201
6:05 PM – May 9, 2020
Twitter Ads info and privacy
44 people are talking about this