नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीसंदर्भात वेगवेगळ्या अफवांना सोशल मीडियावर उधान आलं होतं. त्यावर आता स्वत: अमित शहा यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. मला काही झालं नाही मी पुर्णपणे ठणठणीत असून मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, असे ट्विट करून अमित शहा यांनी माहिती दिली आहे. त्याच बरोबर अमित शहा म्हणाले की कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी रात्री उशिरापर्यंत काम केल्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले नाही.
यावेळी बोलतांना अमित शहा म्हणाले, ‘गेल्या कित्येक दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियातून माझ्या आरोग्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले आहेत. अगदी बर्याच लोकांनी ट्वीट करून माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली आहे. माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी आणि माझ्या हितचिंतकांनी गेल्या दोन दिवसांपासून खूप चिंता व्यक्त केली आहे, मी त्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून, आज मी हे स्पष्ट करू इच्छित आहे की मी पूर्णपणे निरोगी आहे आणि मला कोणताही रोग नाही.
Amit Shah
✔
@AmitShah
मेरे स्वास्थ्य की चिंता करने वाले सभी लोगों को मेरा संदेश।
View image on Twitter
187K
3:52 PM – May 9, 2020
Twitter Ads info and privacy
63.7K people are talking about this
तसेच हिंदूंच्या समजुतीनुसार असा विश्वास आहे की अशा अफवामुळे आरोग्याला बळकटी मिळते. माझ्या चांगल्या विचारण्याबद्दल आणि काळजीबद्दल मी माझ्या हितचिंतकांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या अफवा पसरविणाऱ्या लोकांबद्दल माझे दुर्दैव किंवा द्वेष नसल्याचा टोला त्यांनी अफवा पसरविणाऱ्यांना लगावला आहे. अमित शहा यांनी पसरविण्यात आलेल्या अफवांना प्रत्युत्तर दिल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट केले आहे की, ‘आपणा सर्वांना दीर्घायुष्य लाभो. त्याचवेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत खास बातचीत करताना सांगितले की आरोग्यावर अफवा पसरवणे ही एक गलिच्छ मानसिकता आहे.