पुणे (वृत्तसंस्था) – कार्टून पाहू न दिल्याने एका तेरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी येथे घडला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आत्महत्या केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
फिर्यादीनुसार, त्याने नुकताच सातवीच्या वर्गात प्रवेश केला होता. मंगळवारी सकाळपासूनच मुलगा कार्टून पाहत होता. त्याच्या घरच्यांनी त्याला अनेकवेळा सांगूनही त्याने घरच्यांचे ऐकले नाही. शेवटी टीव्ही बंद करून घरातले बाहेर गेले असताना त्याने स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.