नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीनने लडाखमध्ये भारतीय प्रदेशात अतिक्रमण केले आहे का? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना केला होता. याला प्रत्युत्तर लडाखचे भाजप आमदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी दिले आहे. हो, चीनने या भागांवर कब्जा केला आहे. यासोबतच नामग्याल यांनी एक नकाशा ट्विट केला आहे.

जामयांग सेरिंग नामग्याल यांनी म्हंटले कि, होय चीनने या भागांवर कब्जा केला आहे. यामध्ये त्यांनी कॉंग्रेसच्या कारकिर्दीत चीनने अतिक्रमण केलेल्या भागांची यादी दिली. अक्सई चिन ते पांगनाक आणि चाबजी व्हॅली, डूम चेला यासारख्या क्षेत्रांची उदाहरणे दिली आहेत.
दरम्यान, नामग्याल यांच्या ट्विटवनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले कि, लडाखमध्ये चिनी सैनिकांनी प्रवेश केला आणि आमच्या भूमीवर कब्जा केला आहे. तरीही पंतप्रधान एकदम गप्प आहेत असून गायब झाले आहेत. राहुल गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांनी सातत्याने चिनी हल्ल्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला.







