जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली 1395 वर
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज ११४ नवीन रूग्ण आढळून आले असून यात अमळनेर, पारोळा, जामनेर, जळगाव व भुसावळातील रूग्ण सर्वाधीक आहेत. सलग दुसर्या दिवशी १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज अमळनेरात ३९; पारोळा २१; भुसावळ १६; जामनेर ११; जळगाव शहर ९; धरणगाव ३; यावल व एरंडोल ५; जळगाव ग्रामीण ४ व बोदवड १ या रूग्णांचा समावेश आहे.
प्रारंभी अमळनेरात जास्त रूग्ण आढळून आले असले तरी मध्यंतरी येथील संख्या कमी झाली होती. तथापि, गत काही दिवसांपासून येथील बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यात आज नवीन ३९ रूग्ण आल्याने तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे भुसावळ शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सातत्याने १० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. जामनेर तालुक्यातही आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे आजच्या आकडेवारीतून दिसून आहे. आहे.







