जळगाव (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ, धमकी व मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी काका पुतण्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनिल पंडीत दामोदरे (वय-४९) रा.जळगाव हे स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीला आहे. शासकीय कामानिमित्त ते ९ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात जात असतांना पोस्ट ऑफिसजवळ फोनवर बोलत होते. दरम्यान एका कार (एमएच १९, ६५५५) मधून जितू अरूण चांगरे हा गाडीतून उतरला. त्यानंतर त्याने सनिल दामोदरे याला धक्का देवून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यावर ढकलल्याचा जाब विचारला असता, तो म्हणाला की, ‘मै जितू अरूण चांगरे हु। तु जादा बोल मत, तुझे किसको बुलाणा है, उसको बुला मै डरता नही. मै आपको जाने नही दुंगा’ असे बोलून गाडीच्या डिक्कीतून लोखंडी पान्हाने मारायला सुरूवात केली. त्यानंत जितू चांगरेच्या भावाचा मुलगा आला तो देखील मारू लागला. यात सरकारी कामाचे कागदपत्रे फेकून दिली. जखमीवस्थेत शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सुनिल दामोदरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितू चांगरे व भावचा मुलगा (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.