नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढीस लागल्याने सर्वत्र चिंतेची वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉक डाऊन येत्या मंगळवारी पूर्ण होत असला तरी सद्य परिस्थिती पाहता केंद्र सरकार लॉक डाऊनची मुदत वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, पंजाब सरकारतर्फे राज्यातील लॉक डाऊनची मुदत १ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबाबततीची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिले असून राज्यातील कोरोना संकटाची सद्य स्थिती पाहता येत्या १ मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून या चर्चेमध्ये लॉक डाऊनच्या कालावधीत वाढ करण्याबाबत चर्चा होणार असल्याची वृत्त माध्यमांमध्ये झळकत आहेत. मात्र पंतप्रधानांशी चर्चा करण्याआधीच पंजाबने राज्यामध्ये लॉक डाऊन वाढवल्याचे जाहीर केले आहे.








