जळगाव :- न झालेल्या बढतीसह बदलीचा गवगवा करीत लॉकडाउनचे उल्लंघन करीत चेल्यांकडून विविध ठिकाणी जाहीर सत्कार घडवून आणल्याने गोची झालेले यावलचे पो.नि. अरूण धनवडे यांच्यावर २५ एप्रिल रोजी जमावबंदीचे उल्लंघन करून २०० जणांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता. तसेच त्यांनी सिंघम स्टाईलचा व्हिडीओ लोकडाऊन असतांना व्हायरल केला होता. आणि यावल शहरात ठिकठिकाणी सत्कार स्वीकारल्याचे फोटोही यात झळकले होते . याचाच अर्थ त्यांनी आपल्या कार्यकाळात तीनवेळा लोकडाऊनचे उल्लंघन केल्याचे चित्र उघड झाले असताना देखील पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारतील का ? असा प्रश्न सर्वसामान्य यावलकरांना पडला आहे.
पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना सध्यातरी यावल येथे ३ महिन्याचा कालावधी झालेला आहे. परंतु याकाळात त्यांनी विकासकामे केली असल्याचा दावा २५ एप्रिल रोजी पोलीस स्टेशनसमोर बसलेल्या जमावातून एकाने केला आहे. अर्थात पोलीस निरीक्षक हे राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी आहेत का ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे . तथाकथित प्रमोशन एमआयडीसी पोलीस स्टेशनला झाल्याचेही श्री . धनवडे यांनी कबुल केले होते . मात्र असे कुठलेही आदेश नसताना त्यांच्या समर्थकांनी बदली होऊ नये यासाठी जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता . मात्र वरील सर्व प्रकरणांची दखल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे घेतील का ? याप्रकरणी केसरीराजचे संपादक भगवान सोनार यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री ,गृहमंत्री ,मुंबई पोलीस महासंचालक , विशेष पोलीस महासंचालक नाशिक , जळगाव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जळगाव आदींकडे ईमेलद्वारे पुराव्यानिशी १ मे रोजी तक्रार दिली आहे . लवकरच या तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरच्या सूत्रांनी दिले आहे .