नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – चीनमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले असून कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत १७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे आणि हा व्हायरस आता जगभरातील जवळपास २५ देशांमध्ये पसरला आहे. या कोरोनामुळे जगप्रसिद्ध पॉपस्टार केटी पेरी देखील वैतागली असून आपल्या लग्नाची तारीख तिला पुढे ढकलावी लागली आहे.गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता ऑरलँडो ब्लूमला केटी पेरी डेट करत आहे. नुकतेच त्याच्यासोबत लग्न करत असल्याची घोषणा तिने केली होती. जपानमध्ये ती विवाहबद्ध होणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे चीनसोबतच जपान देखील हैराण झाला आहे. जपानमध्ये देखील कोरोनाग्रस्त शेकडो रुग्ण सापडले आहेत. परिणामी आपल्या लग्नाची तारीख केटीने आणखी पुढे ढकलली आहे.