जळगाव (प्रतिनिधी) – एल सी बी विभागाची कारवाई ता.पाचोरा तालुक्यातिल राणिचे बाबंरुड परिसरातील जंगल भागात जाणाऱ्या एकाच्या शेतात नकली देशी विदेशी दारू बनविण्यात येत असल्याच्या गोपनीय माहीती वरून स्थानिक गुन्हा अन्वेशन जळगाव शाखेच्या पथकाने छापा टाकुन सुमारे १ ते सव्वा लाखांची बनावट दारू व दारू बनविण्याचे साहित्य जप्त करून बनावट दारूचा कारखाना उध्दवस्त केल्याने खळबळ उडाली आहे. या मोठया कार्यवाहिने चोरट्या पध्दतिने दारू विक्रि करणार्यांचे तालुक्यात राॅकेट सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ही बनावट दारू बनविणाऱ्या रॅकेटचे मुख्य दोन सूत्रधार धुळे-शिरूड या भागातील असल्याचे ताब्यातील आरोपी कडून माहिती मिळाली आहे.
याबाबत प्राप्त माहीती पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ.पंजाबराव उगले व अप्पर पोलिस अधिक्षक श्री.गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहीतीच्या आधारे पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे शिवारात बनावट दारू बनविणे व विक्री करण्याचा कारखाना सक्रिय असल्याची माहीती मिळाली होती. याची खातरजमा करण्यासाठी महिनाभरा पासून गुन्हे अन्वेषण विभागाने पळत ठेवली असल्याचे कळते! ह्या प्रकाराची शहानिशा करून जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरिक्षक बापु रोहोम,सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल नाईक,पोलीस हवलदार रामकृष्ण पाटिल,शरद भालेराव,सुनिल दामोदरे,महेश पाटिल,योगेश वराडे व अशोक पाटिल या पथकाने दि.१४ मार्च रोजी सहा ते आठ वाजे दरम्यान सापळा रचुन इस्माईल रसूल मेवाती याच्या शेतात छापा टाकला असता एक संशयित आरोपी सलमान इस्माईल मेवाती( रा. बांबरूड राणीचे) तेथे देशी -विदेशी दारू व बनावट दारू बनविण्याच्या साहित्या सह रंगेहात पकडला. या धाडशी छापेमारीत आय.बी.,टॅंगो पंच व मॅकडाॅल व्हीस्की सह सुमारे साडे तीनशे रिकाम्या बाटल्या व बुच या कंपनीच्या बाटल्या आढळुन आल्या. बाजार भावा नुसार ही बनावट दारू सुमारे एक ते सव्वा लाख रूपयांची दारु आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात राञी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान या बनावट कारखान्यामुळे तालुक्यात बनावट दारू बनवविण्याचे आणि विक्री करणारे राजेत सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगांव एल सी बी विभागाने पाचोरा तालुक्यात केलेल्या धाडशी कार्यवाहीची कौतुक होत आहे . सदर गुन्ह्याचे धागेदोरे व मुख्य दोन सूत्रधार हे धुळे जिल्हयातील शिरूड भागातील असल्याची माहिती ताब्यातील आरोपीने उघड केली आहे.
हातभटी वर कारवाईची मागणी
परिसरातील मोठ् या प्रमाणावर हात भटी वर दारू पाडली जाते त्यामुळे अनेकाचे संसार उध्वस्त झाले आहेत विशेष म्हणजे तरुण वर्ग या व्यसनाकडे जास्त वळला आहे या व्यसना मुळे बरेच तरुणाचे लग्न होत नाही व प्रसंगी तरुण वाम मार्गाला वळत आहे मात्र पोलीस प्रशासन नुसती बघायची भूमिका घेत आहे पोलीस प्रशासन नुसते कारवाई करण्याची कागवा करते मात्र कारवाई होत नाही तरी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी लोकांकडून केली जात आहे