जामनेर ;- तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी अंतर्गत तिसर्या टप्प्यात लसीकरण आज़ २ रोजी नेरी बुद्रुक येथे कोविड लसीकरन शिबिर आयोजित करण्यात आले होते.यात नागरिकांना लसीकरण करण्यात आले .वैद्यकीय अधिकारी डॉ सारिका भोळे , आश्विनी कुरणकर , आरोग्य सेविका पाटिल सिस्टर ,आरोग्यसेवक विजेंद्र पवार ,भावसार ताई, गटप्रवर्तक नीलिमा गवळी, आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले . शिबिरस्थळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ राजेश सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे,वैद्यकिय अधिकारी डॉ नरेश पाटील यांनी भेट दिली सरपंच कल्पना कुमावत , ग्रामपंचायत सदस्य भगवान इंगळे ,कल्पेश बेलदार ,माधव ईधाटे, संदिप खोडके, गणेश कुमावत व ग्रामस्थांनी लसीकरणासाठी सहकार्य केले .