परिश्रम, सातत्य असल्यास हमखास यश
जळगाव ( प्रतिनिधी ) – कोणत्याही क्षेत्रात परिश्रम, सातत्य असल्यास हमखास यश मिळविता येते, हे वाक्य डोळ्यासमोर ठेवूनच मी दररोज न चुकता नियमित अभ्यास करीत राहिली व अकाउंटस् या विषयात ९९ गुण मिळविता आले, असे नेहा विजयकुमार सैतवाल या विद्यार्थिनीने सांगितले. सोमवारी ५ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात स्वामी विवेकानंद कनिष्ट महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असलेल्या नेहा सैतवाल हिने ८१.५० टक्के गुण मिळविले.
तिच्या निकालाचे वैशिष्ट म्हणजे तिने अकाउंटस् या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे. या सोबतच इकॉनॉमिक्स (अर्थशास्त्र) विषयातही तिला ९० गुण आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील यांना दिले आहे. पत्रकार विजयकुमार सैतवाल यांची ती कन्या आहे.









