राखीपोर्णीमेचा सण उत्साहपुर्ण वातावरणात साजरा….!

प्रमोद चौधरी, एरंडोल
भावाबहीणींच्या नात्याचा उत्सव म्हणजे राखीपोर्णीमा हा सण उत्साहपुर्ण वातावरणात साजरा झाला .बहीण भावाचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अनादी काळापासून प्रचलीत आहे .भगवान श्रीकृष्ण व द्रोपदी यांचे बहीण भावाचे नाते सर्वश्रुत आहे .तसेच ईतिहासामध्येही राखीपोर्णीमेच्या राखीला अनन्यसाधारण महत्त्व आहे .
झाशीच्या राणीने मुस्लीम समाजातील बांदाचे तत्कालीन नवाब अली बहाद्दुर यांना राखी पाठवुन त्याची पायाभरणी केली होती .आपल्या बहीणीला राखी भेट म्हणून नवाब फिरंगी सैन्याकडुन दहा हजार सैन्यासह झाशीला पोंहचला होता .
अशा प्रकारचे अनेक किस्से आपल्याला पहावयास मिळतात म्हणून हिंदू समाजात राखीपोर्णीमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे .राखीपोर्णीमेचा सण विसाव्या शतकातही तितक्या च मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे .
दि २२ रोजी रविवारी राखीपोर्णीमा सण आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळी भावाला मंगलस्नान घालून गोडधोड खायला घालून आपल्या रितीरिवाजाप्रमाणे भावाला बहीणींनी राखी बांधुन आपले रक्षण करण्यासाठी धागा बांधल्या भावाने आपल्या ऐपतीनुसार बहीणींना ओवाळणी दिली.ज्यांनी आपल्याला बहीण नाही अशा भावांनी धर्माच्या बहीणीकडुन राखी बांधून घेतल्या .
सर्वधर्म समभाव जोपासना करणारा हा सण भारतीय अस्मीतेचे प्रतीक असलेला हा सण उत्साहाने साजरा करण्यात आला.







