जळगाव ;- यावल तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेला १५ ऑगष्ट रोजी परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना मनसेचे जनहित कक्षतालुका अध्यक्ष कल्पेश पवार यांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र सद्यस्थितीत कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घ्यावी किंवा कसे याबाबत मार्गदर्शनासाठी काही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून शासनाकडे विचारणा करण्यात आली होती. या अनुषंगाने नमूद करण्यात येते कि महाराष्ट्र शासनाच्या संदर्भाधीन आदेशान्वये प्रदुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. सदर बाब विचारात घेता प्रस्तुत प्रकरणी कळविण्यात येते कि जिल्ह्यातील मागील एक महिन्यातील कोवीड रुग्णसंख्या व जिल्ह्याचा Positivity rate तसेच ज्यामध्ये ग्रामसभा आयोजित करावयाची आहे सेबील कोणसंख्या(Active Patient या सर्व बाबी ध्यानात घेऊन १५ रोजीच्या ग्रामसभेबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपसात समन्वयाने निर्णय घ्याचा ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्यास कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे परिपूर्ण पालन करून सदर ग्रामसभा घेण्यात यावी. उपरोक्त पत्रकानुसार नायगाव ता.यावल ,जि. जळगांव या गावात गेल्या २ महिन्यात एकही कोविड रुग्ण नाही.
या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा व ग्रामपंचायत विभागाला आदेश देऊन ग्रामसभेची परवानगी द्यावी अशी मागणी मनसेचे जनहित कक्षतालुका अध्यक्ष कल्पेश पवार यांनी केले आहे.