शिंदे गटातून एकही महिलेला संधी नाही ?
नागपूर (विशेष प्रतिनिधी) :- राज्याच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी काही काळात सुरु होत आहे. या मंत्रीमंडळात भाजपकडून ३ महिलांना तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून १ महिलेला संधी मिळत आहे. मात्र लाडका भाऊ एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकही महिला मंत्रीपदी शपथ घेणार नसल्याची बाब समोर येत आहे. याबाबत राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
महायुती सरकारमध्ये भाजपचे एकूण १३२ आमदार असून त्यातील २ महिला आमदार मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांच्यासह विधानपरिषदेच्या महिला आमदार पंकजा मुंडे यांना संधी मिळत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकूण ४१ आमदार निवडून आले असून त्यातील अदिती तटकरे यांना पुन्हा एकदा संधी मिळत आहे. याशिवाय शिवसेना शिंदे पक्षात ५७ आमदार निवडून आले असून मात्र मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री राहणार नाही. शिवसेनेच्या ५७ पैकी एकूण ४ महिलांना आमदारकीची संधी या विधानसभा निवडणुकीत मिळाली आहे.