नवी दिल्ली (वृत्तसंथा) – चीनसोबतच इतर देशांमध्येही कोरोना व्हायरसचा कहर वाढताना दिसत आहे. इटलीच्या लोम्बार्डीमध्ये 85 भारतीय विद्यार्थी विद्यार्थी डॉक्टरांच्या निगरानीत आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1694 प्रकाराने समोर आली आहेत.
तिकडे, अमेरिकन अधिकाऱ्यांनी सोमवारी देशात दुसरा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पब्लिक हेल्थ – सिएटल अँड किंग काउंटीने सांगितले की, शुक्रवारी एक आणि शनिवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आकडा 3 हजारच्या पुढे गेला. तर 89,073 व्यक्ती संक्रमित झाले आहेत.
लोम्बार्डीमध्ये पावियाच्या इंजीनिअरिंग विभागात एका नन-टीचिंग फॅकल्टीमध्ये संक्रमणानंतर विद्यार्थ्यांमध्ये दहशत वाढली आहे. 15 इतर स्टाफला वेगवेगळे केले आहे. बंगळुरुची एक विद्यार्थिनी अंकिता केएसने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले, ‘‘आमच्यापैकी अर्ध्या विद्यार्थ्यांनी तिकिटे बुक केली होती, पण फ्लाट्स दरदिवशी कॅन्सल होत आहेत. नवे तिकीट खूप महागडे आहे. येथे किराणा दुकानांमध्ये वेगाने स्टॉक संपत आहे. आम्हाला भीती आहे की, परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. त्यामुळे, भारत सरकारला अपील आहे की, त्यांनी आम्हाला येथून काढण्यासाठी पाऊले उचलावीत.’’ माहितीनुसार, पावियामध्ये फसलेल्या 85 भारतीय विद्यर्थ्यांमध्ये 25 तेलंगणा, 20 कर्नाटक, 15 तामिळनाडू, 4 केरळ, 2 दिल्ली आणि राजस्थान, गुडगांव आणि 1-1 देहरादूनचे आहेत. यातील सुमारे 65 इंजीनिअरिंग विद्यार्थी आहेत.
इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा विद्यार्थी पुरुषोत्तम कुमार मधु 10 मार्चला भारतात येण्यासाठी उड्डाण करणार आहे. पण याबद्दल संशय आहे की, फ्लाइट संचालित होईल की नाही. पुरुषोत्तम म्हणाला, ‘‘मला सांगितले गेले आहे की, खाडी देशांतून जाणारी जास्तीत जास्त उड्डाणे रद्द केली जात आहेत. तसेच भारतीय विमानतळांवर पोहोचल्यानंतर तिथे 10-15 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणेदेखील चिंतेचा विषय आहे.’’