महायुतीबाबत दुपारी पत्रकार परिषदेत घोषणा करणार असल्याची दिली माहिती
जळगाव प्रतिनिधी – येथील भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र उर्फ दीपक सूर्यवंशी यांनी प्रभाग क्रमांक ६ येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने संधी दिली तर कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. तसेच महायुतीबाबत दुपारी पत्रकार परिषदेत घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रभाग क्रमांक ६ येथे अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. ही विकास कामे पूर्ण करण्यासाठी आमची उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महायुती बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सकारात्मक चर्चा सुरू आहे. दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे.









