• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवाब मालिकांचे फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2021
in खान्देश, जळगाव
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – मी गैरप्रकारे किंवा दबाव टाकून किंवा अंडरवर्ल्डकडून संपत्ती घेतली नाही तरीही माझा संबंध अंडरवर्ल्डशी जोडायचा असेल तर दाऊद कासकरचं कोकणातील घर सनातन संस्थेने घेतले मग सनातन आणि दाऊद यांचा संबंध आहे असं समजायचं का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केलाय परंतु उद्या अंडरवर्ल्डचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ मुंबईत फोडून अंडरवर्ल्डच्या माध्यमातून मुंबई शहराला ‘ओलीस’ कसे ठेवले. एक व्यक्ती विदेशात बसून खंडणी कुणासाठी वसूल करत होता. तो अधिकारी कुणाचा खास होता याचा भांडाफोड उद्या करणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले.

आज दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर दाऊद आणि बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता त्या आरोपाला नवाब मलिक यांनी लगेच सडेतोड उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी नंतर फटाके फोडण्याची घोषणा केली होती परंतु त्यांचे फटाके भिजल्याने फटाक्यांचा आवाज झाला नाही फक्त वातावरण करण्यात आले असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

१९९९ मध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आमदार बनून या शहरात आले. माझ्या ६२ वर्षाच्या जीवनात आणि २६ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत यासारखे आरोप कुणी लावले नाही. दीड लाख फूट जमीन कवडीमोल किमतीने घेतली असा आरोप करण्यात आला परंतु देवेंद्र फडणवीस तुम्हाला ज्याने माहिती दिली तो कच्चा खेळाडू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

त्या दीड लाख फूट जमीनीवर एक मदीना तुल अमान नावाची कॉ. सोसायटी आहे. जेव्हा १९८४ मध्ये इमारत बनवली गेली. तीच इमारत गोवावाला कंपाऊंडच्या नावाने ओळखले जाते. ज्यामध्ये मुनिरा पटेलने रस्सीवाला याला विकासक करण्याचा अधिकार देऊन १४०-१५० इमारती बनवून सर्वसामान्य लोकांना विकल्या. जिथे आजपण ते प्लॅट तयार आहेत. त्याच्या पाठीमागे जी जमीन आहे. त्यावर मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी आहे. त्याठिकाणी आमचे गोडाऊन आहे. ज्याची जागा सॉलीडस इन्व्हेस्टमेंट कंपनीला लीजवर देण्यात आली होती, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.

या सर्व सत्याला देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ६२ वर्षाच्या जीवनात या शहरात अंडरवर्ल्डशी संबंध आहे असा आरोप कधी झाला नाही. तुम्ही बोलताय एजन्सी समोर जाणार… नक्की जा मी तयार आहे असे खुले आव्हानही नवाब मलिक यांनी दिले.

खोटयाचं अवडंबर माजवून कुणाची प्रतिमा मलिन होईल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही गलतफहमीमध्ये आहात. जे काही आहे त्याची सर्व कागदपत्रे रजिस्टार कार्यालयात आहेत. कंपनीची सर्व कागदपत्रे आहेत. जो आर्थिक व्यवहार झाला त्याची स्टॅम्पड्युटी भरली आहे. २० रुपये फूटात जमीन घेतली आहे असे फडणवीस बोलताय… झूठ बोलो लेकीन ढंगसे बोलो… अशा शब्दात नवाब मलिक यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी जो आरोप लावलाय तो संपूर्ण खोटा आहे. नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते ना बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली. वॉचमनने आपलं नाव त्या जमीनीत लावलं होतं ते रितसर पैसे देऊन कमी केले गेले हे सत्य आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

सीबीआय असो किंवा एनआयएमार्फत चौकशी करा मी कुठल्याही चौकशीला तयार आहे. जो मी बोलतो तेच बोलणार आहे त्यामुळे ज्यांना वाटत असेल नवाब मलिक घाबरेल तर नवाब मलिक कधीच कुणाला घाबरत नाही. हसीना पारकर कोण आहे माहित नाही. सलीम पटेल यांच्याकडे मुखत्यारपत्र गोवावाला परिवाराने दिले होते त्यानुसार व्यवहार झाला. त्यामुळे ही सगळी कहानी रचण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु उद्या जे काही सांगणार आहे त्याची वाट देवेंद्र फडणवीस यांनी बघावी असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.


 

 

Previous Post

राज्यात ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन?

Next Post

भरधाव रूग्णवाहिकेच्या धडकेत बालकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरधाव रूग्णवाहिकेच्या धडकेत बालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
1xbet russia

काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

February 21, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon