नाशिक : लासलगाव येथील तीस वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात आलेल्या या युवकाचे घशाच्या स्त्रावाचे रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, लासलगाव येथील 30 वर्षीय युवकाला गुरुवारी सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने खासगी क्लिनिककडे गेला होता
दुसऱ्या दिवशी तो लासलगाव आरोगय केंद्रात गेला असता, तेथून त्यास तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले . शुक्रवारी त्याचे घशाच्या स्त्रावाचे रिपोर्ट प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट रविवारी रात्री प्राप्त झाले असता त्यात तो पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन हादरले आहे.
त्या युवकाच्या संपर्कात त्याच्याच कुटुंबातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे.