जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मुक्तेश्वर नगर परिसरातून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी संदीप गोकुळ राजपूत (वय २६, रा. तरसोद, ता. जि. जळगाव) हे ३ जानेवारी रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगर भागात त्यांच्या मित्राच्या घरी आले होते. त्यांनी आपली हिरो कंपनीची लाल-काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. एमएच -१९ सीएम-५३१६) मित्राच्या घरासमोर लावली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ३५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली.
या घटनेची तक्रार ५ जानेवारी रोजी दुपारी १२:२४ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या सूचनेनुसार पोलीस हेकाँ राजेंद्र ठाकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.









